कामगार किट पेटी नाही मिळाल्याने गोंधळ चेंगराचेंगरीत अनेक महिला जखमी

Wed 09-Oct-2024,05:41 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर                                          

 

चंद्रपूर बल्लारपूर : जिल्हा कामगार कल्याण मंडळ मार्फत गवंडी मंजूर व इतर मजुरांना किट पेटी व डिनर सेट वाटपाचे काम सुरू झाले आहे . बल्लारपूर येथे काल ७ ऑक्टोबर रोजी नाट्यगृहात शेकडो लाभार्थ्यांना किट पेटी वाटप करण्यात आले. यांची माहिती मिळताच आज सम्पूर्ण जिल्ह्यातील स्त्री पुरुष लाभार्थी मोठ्या संख्येने नाट्यगृहाबाहेर जमले काही नागरिक पहाटे ‌4वाजता काही ‌‌6 वाजता तर काही 9 वाजता पोहोचले गेट न उघडल्याने हजारो लोकांनी रास्ता रोको केला.पोलीसांनी घटनास्थळी पोहोचले आणि गेट उघडले तेव्हाच रस्ता सुरळीत झाला.यावेळी नाट्यगृहाच्या आवारात घुसण्यसाठी चेंगराचेंगरी झाली.ज्यामध्ये अनेक महिला पडल्याने जखमी झाल्या. एका महिलेचा पाय मोडल्याची माहिती समोर येत आहे. चक्कर आल्याने सहा-सात महिला पडल्याचे वृत्त आहे. दुपारपर्यंत वाटपाची कोणतीही व्यवस्था नसल्याने त्रस्त झालेल्या महील्यानी  खाण्यापिण्या शिवाय घोषणाबाजी करत गोंधळ घातला.  ४:०० वाजता पोलिसांनी कामगार कल्याण मंडळच्या अधिकाऱ्याला बोलावून वितरणाबाबत घोषणा केली. त्यानुसार लाभार्थ्यांना त्यांच्या तहसीलमध्ये वितरणाची व्यवस्था करण्याबाबत माहिती देण्यात आली. असे असतानाही लाभार्थी पावसानंतर जायला तयार नव्हते. पोलिसांनीही हुसकवण्याचा प्रयत्न केला पण यश मिळू शकले नाही, साडेचार वाजताही महिला उभ्या होत्या आणि गोंधळ सुरूच होता. 

याठिकाणी घुग्घुस, चंद्रपूर, विसापूर, मानोरा, मूल पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोठारी, कोरपना, गडचांदूर, राजुरा आदी भागातील हजारो महिला सकाळपासून रांगेत उभ्या होत्या मात्र महिलांसाठी पिण्याच्या पाण्याची, चहा, संतापाची लाट उसळली.काही महीलेचे दलाल ने दीड ते दोन हजार रुपये घेऊन फार्म भरुन दिले जात होते.त्यामुळे महिला अधिकच संतापले होते. नाट्यगृहात महिलांचा गोंधळ मुळे अनेक महिलांचा चपलाचे ढीग लागले आहे. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी बल्लारपूर पोलिस स्टेशन चे ठाणेदार सुनील गाडे यांनी चोख बंदोबस्त ठेवले होते. तसेच चंद्रपूर वरुन क्यु आर टी ची टीम पाचारण केले.